कळंबोली पोलीस सुरक्षे सोबत जपतात सामाजिक बांधिलकी...
कळंबोली / दीपक घोसाळकर : वैश्विक महामारी ची दुसरी लाट समाज जीवनावर घातक परिणाम करीत आहे. यावेळी सामाजिक सुरक्षा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम पोलीस करीत आहेत .करोना पासून बचाव करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा  आपल्या प्राणाची बाजी लावत आहे .एकीकडे कायदा-सुव्यवस्था  सांभाळून लॉक डाऊनच्या कालावधीत ज्यांचे हातावर पोट आहे अशा आदिवासी बांधवांना कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत किराणा मालाचे मोफत वाटप  करून सामाजिक बांधिलकी जोपासून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन  घडविले आहे.
               पोलिस यंत्रणा जितकी हवी हवीशी वाटते तितकीच ती  काही वेळा नकोशी ही वाटते. खाकी वर्दीतील खाक्या कोणाच्याच नशिबी येऊ नये असे सर्वांनाच वाटते .मात्र या खाकी वर्दीच्या आड एक मायेचा पाझर झिरपत असतो आणि त्याच्या ओलाव्याने समाजामध्ये  आनंद निर्माण करू शकतो असे  कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी आपल्या कृतीतून करून दाखविले आहे.कोरॉना काळात सर्वच काही बंद असताना व ज्याचे उदरनिर्वाह हे दैनंदिन मिळणाऱ्या मोलमजुरी वरच अवलंबून आहे अशा रोडपाली जवळी फुडलैंड कंपनी च्या जवळ असलेल्या ५० ते ६० आदिवासी समाज बांधवांच्या कुटुंबियांना १५ दिवस पुरेल एवढे किराणा मालाचे सामान आपल्या सहकाऱ्यांसमवेत वाटप करून सामाजिक बांधिलकी ची जपणूक  केली आहे.अनपेक्षित पने आदिवासी बांधवांना किराणा माला सारखे जीवनावश्यक सामान घरपोच मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी कोरोना चे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. आदिवासी वांडीवरील महिलांनी व आबालवृद्धांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना आशीर्वादा समवेत धन्यवादही दिल्याने कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचारीही चांगलेच सुखावले.
Comments