पनवेल, दि.२ (वार्ताहर) :- स्पा च्या नावाखाली गिर्हाईकांशी अश्लिल वर्तन करणार्या महिलांविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई करून या प्रकरणी तिघा महिलांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील यशोनारायण बिल्डींग येथे रिअल लुक फॅमिली सलून अॅण्ड स्पा दुकान थाटण्यात आले होते. या स्पा च्या दुकानाच्या नावाखाली अश्लिल व गैरवर्तनाचे व्यवहार सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांनी पो उप आ, परी 2. पनवेल. शिवराजपाटील, सपोआ, नितीन भोसले-पाटील पनवेल विभाग यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे संजय जोशी यांच्यासह पो उप निरी सुनिल तारमळे, पोहवा रवींद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत ,पोशी विवेक पारासूर मपोशि गोडसे, मपोशि लांघी यांनी सदर ठिकाणी बोगस गिर्हाईक पाठवून याबाबतची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी दिशा पायाळ (23 रा.कळंबोली), सुनिता वोनियार (48 रा.कळंबोली) व काजल गौतम (20 रा.नावडे फाटा) यांना ताब्यात घेतले. तसेच त्या ठिकाणावरुन रोख रक्कमेसह इतर ऐेवज असा मिळून 9 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्यांच्या विरोधात भादवी कलम 294, 144, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फोटो ः स्पा संदर्भातील इमारत