पनवेल दि.25 (संजय कदम)- बेकायदेशीर विक्रीसाठी गांजा हा अमली पदार्थ कामोठे परिसरात आणला असता कामोठे पोलिसांनी सापळा रचून सदर गांजा हस्तगत केला आहे.
कामोठे पोलिस ठाण्याचे वपोनि स्मिता जाधव यांना खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक इसम बेकायदेशीररित्या गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार से.-9 ऐश्वर्या हॉटेलसमोरील मैदानात सापळा रचून आरोपी श्रीकुट्टन उन्नीकृष्णन नायर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 किलो 266 ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा हा अमली पदार्थ, त्याच्याजवळ असलेला मोबाईल फोन असा मिळून जवळपास साडे 28 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे व त्याच्याविरूद्ध भादंवि कलम 188, 270 सह एन.डी.पी.एस कायदा 1958 चे कलम 8 (क), 20 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच्या अटकेमुळे कामोठे वसाहतीत मोठ्या प्रमाणात चालणारे अशा प्रकारचे धंदे उघडकीस येणार आहेत.