९५ वर्षीय पोहरी सिंग या यंगस्टारची करोनावर यशस्वी मात...
पनवेल / वार्ताहर :-  नवी मुंबईत, पनवेल मध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतंच एका ९५ वर्षांच्या पोहरी सिंग या यंगस्टारने करोनावर यशस्वी मात केली आहे. अवघ्या १४ दिवसांत योग्य ते उपचार घेतल्यानं त्यांना कळंबोली मधील कोविड सेंटर मधुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रा मधील खांदा कॉलनी या वसाहती मध्ये राहणाऱ्या या वयोवृद्ध व्यक्तीचा ८ एप्रिल रोजी करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला संसर्ग झाला होता. उपचारांसाठी त्यांना कळंबोली मधील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं होतं.

आज कळंबोली कोविड सेंटर या ठिकाणी पोहरी सिंग या ९५ वर्षांचा वयोवृद्ध यंग स्टार आज कोरोना पासून मुक्त होऊन घरी जात असताना त्या ठिकाणी असलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. खरच या पेशंटला पाहत असताना गेले १० दिवस मी सातत्याने कोविड सेंटर मध्ये जात असताना जे मनाला वाटत होतं की खरंच आज कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून एक प्रश्न निर्माण होत होता ही कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकचे जीव जात आहे. की आता फेसबुक, सोशल मीडिया, सातत्याने नागरिकांमध्ये होत असलेल्या कोरोनाची चर्चा करत असताना भीती माणसाच्या मनात हृदयात भीतीपोटी आपला जीव गमावत आहेत.आज त्याच प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आहे. की नागरिकांच्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मी नागरिकांना आव्हान करेल की  कोरोनाला घाबरुन जाऊ नका कोरोनाचा संसर्गमुळे आपल्या जीवाला धोका होतो. त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपला जीव भीतीपोटी जात आहे. 
त्याच्यामुळे कोरोनाला घाबरुन न जाता महाराष्ट्र सरकारने जे निर्बंध दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करुन आपल्या मनातील भीती आहे. ती पूर्णपणे बाहेर काढून टाका. कोरोना हा संसर्गजन्य रोग असला तरी तो इतर आजारासारखा रोग आहे.आपल्या आयुष्यात राहणार आहे असं मला वाटतं आणि त्यासोबत आपल्याला  जगायचं सुद्धा आहे. आज जर पोहरी सिंग ह्या ९५ वर्षाचा यंग स्टार कोरोना वर  मात करु शकतो तर आपल्या मनातील भीती निघाली तर शंभर टक्के आजार पूर्णपणे घरच्या घरीच बरा होऊ शकतो.

 त्यामुळे आपल्या मनातील पूर्णपणे  भीती काढून टाकावी एवढीच हात जोडून नागरिकांना नम्रतेची विनंती आहे. असे आवाहन नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले आहे.
Comments