रिक्षा चालकांना शासनाने जाहीर केलेली मदत कशी मिळणार, रिक्षा चालक संभ्रमात - संतोष आमले
पनवेल, दि.२७ (वार्ताहर) ः लॉकडाऊन मुळे रिक्षा चालकावर उपास मारीची वेळ आली आहे व्यवसाय बंद झाले आहे, घर कसे चालवायचे या चिंतेत महाराष्ट्रातला रिक्षा चालक पडला आहे.
यात सरकारने तोकडी मदत परवाना धारकांला 1500 रुपयांची मदत जाहीर करून थोडा दिलासा दिला परंतु 1500 रुपयांची मदत कशी मिळणार याची माहिती सरकारने जाहीर न केल्या मुळे रिक्षा चालक संभ्रमात पडला आहे. शोशल मीडिया मध्ये त्या बद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे व्हाट्स अँपवर कागद पत्र जमा करा लिंक वर माहिती भरा असे सध्या सर्वत्र पसरले आहे. तरी आपली वैयक्तिक माहिती कुठे ही भरू नये आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. माहिती भरण्यासाठी अजून सरकार कडून कुठली अधिकृत साईट किंवा माहिती पत्रक जारी केले नाही तरी रिक्षा चालकाने अफवावर विश्‍वास ठेऊ नये असे अधिकृत माहिती आल्यास सर्व रिक्षा चालकांना दिली जाईल असे आव्हान संतोष शिवदास आमले यांनी केले.
Comments