पनवेल : कोरोनामुळे संचार बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. याचा विचार करून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या वतीने झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
लॉक डाऊनमुळे गरीब, गरजू नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची अन्नाची परवड होते. अनेकांना उपाशी राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. अशातच सामाजिक बांधिलकी जपत खांदा कॉलनी पोलीस स्टेशन तर्फे खांदा कॉलनी, सेक्टर 12 येथील झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नाचे वाटप करण्यात आले.