युसुफ मेहेरअली सेंटरचे जेष्ठ समाजसेवक मदन मराठे यांचे दुःखद निधन...
पनवेल दि.२५ / वार्ताहर
युसुफ मेहेरअली सेंटर ह्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत    स्विकारून अंतिम माणसाच्या विकासासाठी अविरत झटणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मदन माधव मराठे (उर्फ मदन भाऊ) यांचे शनिवारी वयाच्या ६३ व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, समाजवाद आणि विज्ञान निष्ठेची मुल्ये रुजविण्यासाठी पांडुरंग सदाशिव साने (गुरुजींनी) स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दल संघटनेमध्ये पूर्णवेळ सेवक म्हणून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा समाजवादी नेते भाई वैद्य, माजी शिक्षण मंत्री सदानंद वर्दे, केंद्रीय रेल्वेमंत्री तथा कोकण रेल्वेचे जनक प्राध्यापक मधु दंडवते, मृणाल गोरे, स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर जी. जी. पारिख अशा अनेक मान्यवरांसोबत व त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांनी काम करणाऱ्या युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्य, गरीब, आदिवासी, पीडितांच्या उद्धारासाठी आपल्या तारुण्यातील तब्बल तीस वर्ष सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणारे श्री मदन माधव मराठे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले सन १९५६ साली जन्मलेले मदन मराठे यांचे मूळ गाव जरी पुणे असेल तरी त्यांची कर्मभूमी मात्र रायगड जिल्हा होती सन एकोणीसशे एकोनव्वदमध्ये रायगड जिल्ह्यात मोठा महापूर आला होता या महापुरामध्ये रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली तालुक्यातील जांभूळ पाड्यासह पेण तालुक्यातील अनेक गावच्या गाव उध्वस्त होऊन पशुधनासह मोठ्या प्रमाणात मनुष्य जीवित हानी झाली होती या महापुरामध्ये बाधित कुटुंबांसाठी मदन मराठे यांनी आपल्या सहकाऱयांसह केलेले मदत कार्य आणि संस्थेच्या माध्यमातून बांधलेल्या शाळांच्या इमारती आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत. आज पासून चाळीस वर्षांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर पेण आणि पनवेल याव्यतिरिक्त कुठेही रुग्णालय नव्हते त्यामुळे परिसरातील हजारो आदिवासी ग्रामीण रुग्णांसाठी युसुफ मेहेरअली सेंटरचे रुग्णालय हे एकमेव रुग्णालय होते त्यामुळे सेंटरच्या रुग्णालयात रात्री अपरात्री केव्हाही रुग्ण आल्यास तो रुग्ण रुग्णालयातील डॉक्टरांऐवजी सर्वप्रथम मदन भाऊ आहेत का? हा प्रश्न विचारणार याचे कारण म्हणजे आपल्याला मदन मराठे भेटले तर आपला आजार लगेच बरा होईलच ही भाबडी आशा घेऊन हे रुग्ण मदन भाऊंकडे यायचे आणि मग त्या रुग्णासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारे मदन मराठे ड्रायव्हर  वाट न बघता प्रसंगी ॲम्बुलन्सची चावी घेऊन स्वतः त्या रुग्णाला पुढे अलिबाग जिल्हा रुग्णालय असो की मुंबई येथे पुढील उपचारासाठी घेऊन जायचे त्यामुळे परिसरातील गावागावात मदन मराठ्यांची चाहते निर्माण झाले होते. सन एकोणीसशे नव्वद मध्ये जेंव्हा गुजरातमध्ये जातीयवाद उफाळून आला होता अशावेळेस राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मूळचे गुजरात प्रांतातील असलेले युसूफ मेहरअली यांच्या नावाने समाजवादी नेते प्राध्यापक मधु दंडवते, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील नेत्या श्रीम. मंगला पारिख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई ते कच्छ गुजरात अशी पायी 'मानव ज्योत यात्रा' काढून सर्वधर्म समानतेचा संदेश यात्रेचे नियोजन व नेतृत्व २६ जानेवारी २००१ रोजी भद्रेश्वर, मुंद्रा, भुज, कच्छ येथे झालेल्या भूकंपातील  भूकंपग्रस्तानच्या पुनर्वसनामध्ये मराठे यांचे मोठे योगदान आहे या भुकंपा दरम्यान हरवलेल्या सुमारे साडेतीनशे भूकंपग्रस्तांना घर बांधून देण्यामध्ये व त्यांचे पुनर्वसन करण्यामध्ये मदन मराठे यांचे मोठे योगदान आहे आणि त्यामुळेच गुजरातमधील भद्रेश्वर येथे युसुफ मेहेरली सेंटरची शाखा आजही समाजकार्याचे काम करीत आहे सन दोन हजार तीनमध्ये युसूफ मेहरअली यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहा राज्यातील चाळीस तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन भारतातील १७ राज्यात जाऊन शांती सद्भाव समता यात्रेच्या माध्यमातून युसूफ मेहेरअली आणि महात्मा गांधींच्या ग्रामीण विकासाबद्दलच्या संकल्पनाचा प्रचार प्रसार करन्याचे काम करत असताना अन्यायाविरुद्ध लढणारे अनेक संघर्षशील कार्यकर्ते घडविण्याचे मोठे काम करणारे श्री.मदन माधव मराठे (मदन भाऊ) यांचे शनिवार दि. २४/०४/२०२१ रोजी सकाळी नऊच्या सुमारास वयाच्या ६४व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले आहे. त्यांच्या एकाकी जाण्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत
Comments