विनाकारण फिरणार्‍यांवर वेषांतर करून पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा
पनवेल, दि.28 (संजय कदम) ः राज्यात कडक निर्बधाची घोषणा करून देखील, विना कारण रस्त्यावर फिरणार्‍या तसेच क्रिकेट, व्हॉलीबाल सारखे खेळ खेळणार्‍यावर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही हे टाळण्यासाठी आता पोलीस खाजगी वाहनांमध्ये तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 
पनवेल शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, खारघर, कामोठा, कळंबोली, कामोठे आदी पोलीस ठाण्यामार्फत आता ही कारवाई सुरू करण्यात आली आाहे. नुकतेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहती मधील 90 रहिवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. 

यामध्ये महिला आणि वयोवृद्धाचा समावेश आहे. या कारवाई नंतर अनेकांनी पोलिसां सोबत हुज्जत घातल्याचे प्रकार देखील घडला आहे. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 1 मे पर्यत कडक निर्बधाची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळून इतर व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. असे असताना देखील अनेक रहिवाशी विनाकारण रत्यावर फिरताना दिसून येत आहे. अश्या निर्बधाची पाय मल्ली करण्यावर सध्या पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहतीमध्ये इव्हीनिग वॉक साठी घरातून बाहेर पडणार्‍या तसेच मोकळ्या मैदानात क्रिकेट मॅच आणि व्हॉली बॉल खेळणार्‍याना अटक करुन त्याच्यावर कारवाई केली आहे. जवळपास 90 हुन अधिक रहिवाशियावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये महिला आणि मुलीचा सहभाग आहे. त्या सोबत वयोवृद्ध देखील दिसत आहे. या सर्वांना कामोठे पोलीस ठाण्यात आवारात उभा करून त्यांना समज देण्यात आला तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून 500 रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे.

चौकट
साध्या वेशात रस्त्यावर फिरून पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांची ही कारवाई
राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यत कडक निर्बधाची घोषणा केली आहे. मात्र रहिवाशी बिनदीखत रस्त्यावर फिरत आहे. मात्र यांच्या वर कारवाई करण्यासाठी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी, साध्या वेशात जाऊन आज कामोठे वसाहतीमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यावर कारवाई केली आहे. खाकी वर्दीत गेल्या नंतर रहिवाशी पळून जातात त्याच्या साठी सध्या ड्रेस मधून जाऊन ही कारवाई केली आहे.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image