देवदूतांवर नियतीने घातला घाला...

देवदूतांवर नियतीने घातला घाला.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर  8 च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट टॅक्सीला कंटेंनरने मागून धडक दिली होती. त्याच दरम्यान तेथे पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुशांत मोहिते वय - 26 व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे व  इतर 2 जण त्या अपघातात मदत करण्यासाठी  आपली मर्सिडीज  गाडी घेऊन थांबले असताना अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने  मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुशांत मोहिते वय - 26 यांचा मृत्यू झालेला असून त्यांचेसह प्रथमेश बहिरा वय 24 यांचा देखील मृत्यू झाला आहे. हर्षद खुदकर  हे जखमी झाले असून त्यांना MGM  हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळेnbsp; हे  सुखरूप आहेत.

या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

या वेळी आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा - पळस्पे, देवदूत, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, डेल्टा  फोर्स यांनी मदत केली आहे. 

अपघातात मदतीला थांबलेल्याचा अपघात होणं खूप दुःखद आहे. पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image