पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी ते फेब्रुवारी 2021 महिन्यात झालेल्या चार्टड अकाऊंट (सीए) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातून सातार्याची धनश्री सुभाष बिचकर ही पहिली आली आहे. याबद्दल तिचे पनवेलमधील व्हिक्टरी फाऊंडेशन व जनहित महिला मंडळ या संस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
सीए परीक्षेला संपूर्ण देशातून 3116 विद्यार्थी बसले होते. यातून 41 विद्यार्थी पास झाले. परीक्षेचा निकाल 1.41 टक्के लागला. या परीक्षेत महाराष्ट्रातून सातार्याची धनश्री सुभाष बिचकर ही विद्यार्थिनी पहिली आली आहे. घरची आर्थिक परिस्थिती गरीब असूनही धनश्रीने तिच्या अभ्यासू, जिद्दी, होतकरू वृत्तीने अभ्यास करून उच्च शिक्षण घेतले आहे. तिच्या या यशाबद्दल व्हिक्टोरी फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय केणी (पनवेल), जनहित महिला मंडळाच्या अध्यक्ष गौरी केणी यांनी अभिनंदन केले.
फोटो ः धनश्री बिचकर