सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने जवळपास तीन लाखांचे मंगळसूत्र लंपास..

पनवेल दि.25 (संजय कदम)-सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन जवळपास 3 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र लबाडीने चोरून नेल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.          
कामोठे वसाहतीमधील से.-12 याठिकाणी असलेल्या आर जे ज्वेलर्स या दुकानात आरोपीने येऊन सोनेखरेदी करणाऱ्या बहाण्याने इतर दागिने काढावयास लावून हुशारीने दुकानदारांच्या नकळत 78 ग्रॅम 350 मिलीचे सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमतजवळपास 3 लाख इतकी आहे. ते लबाडीने चोरून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments