पनवेल महानगर क्षेत्रातील कोविड लढ्याच्या तयारीचा व प्रशासकीय सुविधांचा खा.श्रीरंग बारणेंनी घेतला आढावा..
पनवेल दि.22 (वार्ताहर): आज महानगरपालिका येथे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ह्यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील ह्यांनी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी खासदारांनी महानगर क्षेत्रातील कोविड लढ्याच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिकेला गरजेच्या असलेल्या प्रशासकीय सुविधांची माहिती घेतली. 
          वाढत्या कोरोना रूग्णांच्या संदर्भात काय काय उपाययोजना कऱण्यात येत आहेत. यासंदर्भात खा. श्रीरंग बारणे यांनी यावेळी चर्चा केली. तसेच शासनामार्फत आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ह्यावेळी सोबत प्रांत अधिकारी नवले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते.
          फोटोः खा. श्रीरंग बारणे ह्यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सल्लागार  बबनदादा पाटील ह्यांनी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख ह्यांची घेतली भेट सोबत प्रांत अधिकारी नवले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त संजय शिंदे आदी
Comments