पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई ; १४ सायकली जप्त...
पनवेल, दि.३१ (संजय कदम) ः पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याकडून 14 सायकली हस्तगत केल्या आहेत.

यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि देवळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे व त्यांच्या पथकाने पनवेल परिसरात अधिक शोध घेत असताना त्यांना आरोपी दिनेश जाधव (32) याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून विविध नामांकित कंपन्यांच्या 14 सायकली ज्याची किंमत जवळपास 58 हजार रुपये इतकी आहे. हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

कोट
पनवेल परिसरातून ज्यांच्या सायकली चोरीस गेल्या आहेत त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सायकल खरेदी केलेली पावती अथवा कागदपत्र घेवून सायकलची ओळख पटवून घ्यावी, असे आवाहन सपोनि देवळे यांनी केले आहे.

फोटो ः जप्त केलेल्या चोरीच्या सायकली.





Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image