जीवनावश्यक वस्तूने भरलेला ट्रक दुभाजकावर झाला पलटी
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः जीवनावश्यक
वस्तूने भरलेला ट्रक मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी पनवेल जवळील कल्हे गाव बस स्टॉप येथे दुभाजकावर पलटी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल बाजूकडून कोकणात जाणारा ट्रक क्र.एमएच-43-वाय-2319 वरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर ट्रक दुभाजकावर जावून पलटी झाला आहे. यामध्ये ट्रकसह आतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. 

फोटो ः दुभाजकावर पलटी झालेला ट्रक
Comments