पनवेल, दि.३ (वार्ताहर) ः कळंबोली स्टील मार्केटच्या ओपन गाळ्यामध्ये ठेवलेल्या जवळपास ४ लाख रुपये किंमतीच्या सेंट्रींग प्लेटची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
सास्कोर इंडिया या नावाने या ठिकाणी लोखंडी पाईपची खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. या ओपन गाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे पाईप ठेवण्यात येतात. त्यातील जवळपास ४ लाख रुपये किंमतीचे सेंट्रींग प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.