पनवेल वडाळे तलाव वॉकिंग ट्रॅकवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचा थारोळा आढळून आल्याने परिसरात खळबळ ..
पनवेल / वार्ताहर :- पनवेल शहरातील महानगरपालिका उभारीत असलेल्या वडाळे तलाव वॉकिंग ट्रॅक वर आज सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचा थारोळा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
     
शहरातील वडाले तलावात आज सकाळी मॉर्निग वॉक करताना एक जागरुक नागरिकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्त पडलेले आढळल्याने त्याने तात्काळ पनवेल शहर पोलिसांसोबत संपर्क साधून याबाबत माहिती देतातच घटनास्थळी पोलीस निरीक्षक गोपाळ कोळी व त्यांचे पथक पोहचले. तातडीने त्या ठिकाणी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले.घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला एक कपडा आढळून आला आहे. अधिक तपासाच्या दृष्टीने पनवेल शहर पोलिसांची वेगवेगळी पथके परिसर पिंजून काढत आहेत.
Comments