पनवेल / (प्रतिनिधी) : पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार तथा दैनिक रायगड नगरीचे संपादक सुनिल पोतदार तसेच दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांच्या सूचनेनुसार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने संघर्षवादी महिलांचा सन्मान हा आगळावेगळा सन्मान सोहळा सोमवार दि.८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असल्याचे पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिवसाम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांनी सांगितले आहे.
सदर सन्मान हा पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने सन्मानपूर्वक देण्यात येणार असून यात जीवनात संघर्ष तसेच समाजात आदर्शवत काम करणाऱ्या आणि प्रसिध्दीच्या झोतात नसलेल्या महिलांची या सन्मानासाठी निवड केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या नियम, अटी व शर्तींचे पालन करुन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा सन्मान सोहळा पार पडणार असल्याचे पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील तसेच सचिव मयूर तांबडे यांनी जाहिर केले आहे.