ज्वलनशिल इंधनाने भरलेला टँकर पलटी


पनवेल, दि.२२ (वार्ताहर) ः ज्वलनशिल टँकर पलटी झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे आज दुपारी घडली आहे.
ज्वलनशिल इंधनाने भरलेला टँकर पनवेल बाजूकडून गोवा मार्गाकडे पळस्पे फाटा येथे जात असताना अचानकपणे टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच पळस्पे वाहतूक पोलीस, अग्नीशमन दलाचा बंब व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगत टँकर सरळ केला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
Comments