पनवेल / वार्ताहर :- विरुपाक्ष हॉल समोरील अशोक बाग येथे राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या ड्रेनेज लाईनच्या समस्येबद्दल कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांची भेट घेतली होती.ड्रेनेज लाईन ह्या जुन्या झाल्या आहेत आणि सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणा मुळे ड्रेनेज लाईन माती खाली दबल्यामुळे फुटली होती. यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरली होती.घरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीक असल्यामुळे त्यांच्या आरोग्यवर याचा परिणाम होत होता. कार्यक्षम नगरसेवक तसेच मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित कॉन्ट्रॅक्टरला सांगून नवीन ड्रेनेज लाईन टाकून घेतली व तीन नवीन चेंबर्स पण बांधून दिले.
आपल्या प्रभागातील रहिवाशांच्या समस्या जवाबदारीने आणि स्वतः लक्ष घालून कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सोडवल्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.