पनवेल, दि.३ (संजय कदम) :- खारघर तळोजा कॉलनी ज्वेलर्स फ्रेंड च्या माध्यमातून खारघर सेक्टर २६ ते ३६ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह आयोजित केले होते. सर्वांना बस व ट्रान्सपोर्ट ची सोय करून खारघर तळोजा कॉलनी वेलफेर अससोसिएशननें,ज्येष्ठ नागरिकांना , खारघर मधील जी डी पोळ फाउंडेशन यांच्या लसीकरण केंद्रात ६५ जेष्ठ नागरिकांना कोविडची लस लावण्याचा स्तुत्य उपक्रम पार पाडला.
जी डी पोळ फाउंडेशन या संस्थेच्या खारघर हॉस्पिटल मध्ये,ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम सोय करून सर्वांना त्वरित लस टोचण्याच्या ध्येय ठेवून, सर्व यंत्रणा यादिवशी सज्ज केली होती. सकाळी दहा वाजता पोहोचले सर्व जेष्ठ नागरिक, दुपारी दोन वाजेपर्यंत, लस घेऊन सहिसलामत घरी पोहोचले. हॉस्पिटलमध्ये, लस दिल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकांना अर्धा तास रिकवरी रूम मध्ये ठेवण्यात आले होते व नंतर , डॉक्टरांनी, बारीक नजर ठेवून, सर्व व्यवस्थित असल्याचे खात्री झाल्यानंतरच, सर्वांना घरी जाण्याची परवानगी दिली. या कार्यक्रमास, खारघर तळोजा कॉलेज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मंगेश रानवडे उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सौ अंजली गुप्ता व सौ मेघा मलिक, त्यांनी खूप परिश्रम घेतले.