महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे “ हायवे मृत्युंजय दूत " योजनेची सुरूवात ...
अपर पोलीस महासंचालक डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना “

पनवेल / वार्ताहर :- हायवे मृत्युंजय दूत ” ही योजना मा.अपर पोलीस महासंचालक सो, वाहतुक श्री.भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून उदयास आली . “ हायवे मृत्युजय दूत ” योजना मा.पोलीस अधिकक्ष सोो , रायगड परिक्षेत्र श्री.संजय बारकुंड , पोलीस उप अधीक्षक श्री . संदीप भागडीकर , पोलीस निरीक्षक पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे . महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी “ हायवे मृत्युंजय दूत ” हा उपक्रम सोमवार दिनांक ०१/०३/२०२१ पासुन महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे , येथे सुरू करण्यात आला आहे . 

महामार्गावर होणाऱ्या अपघातामध्ये त्यातील जखमींना तातडीचे उपचार मिळण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुभाष पुजारी यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की , " त्याकरीता हायवे लगतच्या गावातील , मॉल , पेट्रोल पंप या ठिकाणच्या नागरीकांचा महत्वाच्या ठिकाणी चार , पाच जणांचा एक गट बनवून त्यांना ओळखपत्र दिले जाईल . अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलीसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागणार नाही . अपघातग्रस्तांना कसे हाताळावे , तातडीने प्रथोमपचार कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे . अपघात घडल्यानंतर जो वेळ असतो त्याला गोल्डन अवर म्हणतात . अपघाताच्या वेळी काय केले पाहिजे , वेळेत जखमींना हॉस्पीटलमध्ये कसे पाठवावे याचे योग्य प्रशिक्षण हायवे मृत्युंजय दूतांना देण्यात येणार आहे . तसेच हायवे मृत्युंजय दूत यांना ओळखपत्र देण्यात येणार असून चांगले कर्तव्य बजावल्यास प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात येणार आहे . रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेल्या अवॉर्डसाठी चांगले काम केलेल्या देवदुतांची नावे पाठविण्यात येतील अशी माहिती हायवे मृत्युंजय दूत योजनेच्या उद्घाटन प्रसंगी देण्यात आली " . अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप संचालक श्री गुरूनाथ साटेलकर म्हणाले की , महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ मदत केली पाहीजे . एक जखमीचा जीव वाचविला तर संपूर्ण कुटुंब वाचविल्यासारखे असते . तसेच आम्ही गेली १५ वर्षे महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम करीत आहोत . आज या योजनेने खुप समाधान वाटले . देशात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी दीड लाख नागरीक जीव गमावतात . महाराष्ट्र राज्यात त्याचे प्रमाण सरासरी बारा हजार आहे . अपघातामध्ये अनेकांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने जिवाला मुकावे लागले आहे . प्रत्येक गटाला एक स्ट्रेचर व ' फर्स्ट एड ' ( First Aid ) चे साहित्य पुरविण्यात येईल . त्यांना महामार्गावर १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका , खाजगी रूग्णवाहिका तसेच रूग्णालयांची माहिती त्यांचे फोन नंबर उपलब्ध करून देण्यात येतील . जेणेकरून त्यांना जखमींना तातडीच्या वैद्यकिय उपचारांकरीता ' गोल्डन अवर ' मध्ये रूग्णालयात पोहोचविता येईल . यावेळी डॉ.शेख आयआरबी यांनी जखमींना कशा प्रकारे स्ट्रेचरवरून घेवून जाता येईल व प्रथमोपचार याची प्रात्यक्षिके दाखविली . 

सदर कार्यक्रमाकरीता श्री. गुरूनाथ साटेलकर , पदाधिकारी अपघातग्रस्त संघटना, डॉ.श्री.संदेश गोवारी , डॉ.श्री.अक्षय पवार , डॉ.काजोल पडळकर , श्री.अनिल पाटील सरपंच कसळखंड गांव , श्री.अमोल कदम , श्री.नंदकिशोर धोत्रे , श्री.गणेश पाटील बोरले असे मान्यवर उपस्थित होते . त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाकरीता देवदूत , आयआरबी व आजूबाजूच्या गावातील मोठया प्रमाणात देवदूत उपस्थित होते .
Comments