खोटी बिले सादर करुन सुमारे १९.२ कोटी रुपयांचा अपहार ; कंपनी विरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई


पनवेल, दि.५ (वार्ताहर) ः कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाण घेवाण न करता,वस्तु व सेवा कराची खोटी बिले सादर करुन सुमारे १९.२ कोटी रुपयांचा परतावा प्राप्त मिळवून फसवणुक करणार्‍या खारघर मधील मेसर्स ई शॉपी या कंपनी विरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाने कारवाई करुन सदरची बोगस कंपनी चालविणार्‍या सीएला अटक केली आहे.  

या कारवाईत विशाल आहुजा या सीएला अटक करण्यात आली असून त्याने जुलै २०१७ मध्ये आपल्या वडीलांच्या नावाने बोगस कंपनी तयार करुन त्याद्वारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी विक्री करत असल्याचे दाखविले होते. तसेच सदर कंपनीचा पत्ता हा खारघर मधील रवेची हाईट्समध्ये असल्याचे दाखविले होते. दरम्यान, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने खोटी बिले सादर करुन परतावा मिळविणार्‍या कंपन्या व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे.या कारवाईदरम्यान केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाने खारघर मधील मेसर्स ई शॉपी या कंपनीच्या मागील 4 वर्षातील व्यवहारांची तपासणी केली असता, सदर कंपनीने वेगवेगळ्या नावाने खोट्या कंपन्या तयार केल्याचे आढळुन आले. तसेच सदर कंपनीने कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाण-घेवाण न करता, खोटी बिले सादर करुन सुमारे 19.2 कोटी रुपयांचा परतावा प्राप्त केल्याचे केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जीएसटीच्या पथकाने कंपनीच्या खारघर येथील मुळ पत्यावर जाऊन अधिक माहिती घेतली असता, त्याठिकाणी सीए विशाल आहुजा हा कुटुंबासह राहात असल्याचे तसेच त्यानेच तब्बल 19.2 कोटी रुपयांची खोटे परतावे व बिले सादर करुन फसवणुक केल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवा कर रायगड विभागाचे उपआयुक्त बी.एल.रेड्डी यांनी दिली. खोटी बिले सादर करुन परतावा मिळविणार्‍या कंपन्या व व्यक्ती विरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने जोरदार मोहीम उघडली असून अशा प्रकारचे बनावटगीरीचे प्रकार थांबविण्यासाठी सीजीएसटी विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या आयुक्त मनप्रीत अरोरा यांनी सांगितले.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image