एमईएस पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि एन सर्व्हीस ऑफ स्ट्रेरीजच्या सहकार्याने वॉल्कथोनच्या माध्यमातून निराधार व भटक्या जनावरांसाठी निधी उभारणीसाठीचे आवाहन

पनवेल, दि.११ (वार्ताहर) :-  कोव्हीड १९ सर्व जगभर पसरला आहे. या  साथीमुळे बरीच आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे.  याचा परिणाम निराधार व भटक्या जनावरांवरही झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, १४ मार्च, २०२१ रोजी निराधार व भटक्या जनावरांच्या आहार व लसीकरणाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी वॉल्कथोन आयोजित करण्यात आली आहे, ज्यात प्रत्येकाने चालण्याच्या आणि निरोगी जीवनशैली जगण्याच्या आवश्यकतेवर देखील भर दिला आहे. 

या उपक्रमाच्या आयोजना मध्ये पुढाकार घेणारी वास्तुविशारद, अर्चिता कुलकर्णी, एमईएस पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्किस्ट्रक्चर ची माजी विद्यार्थीनी आणि एन सर्व्हीस ऑफ स्ट्रेरीजच्या या एनजीओ ची संस्थापिका, ही वैयक्तिकरित्या निराधार भटक्या प्राण्यांची गरज भागवते. या वॉल्कथोनमधे मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमात 3 कि.मी. चालणे हे आव्हान आहे, ज्यामध्ये आम्ही प्रति सहभागीच्या नावाने १००/ - रुपये देणगी उभी करू. या व्यतिरिक्त ३  कि.मी.ची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक १  कि.मी. मध्ये १० रुपये इतकी अतिरिक्त रक्कम छॠजला जमा केली जाईल. ही देणगी एमईएस पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्किस्ट्रक्चर च्या स्टुण्डन्ट कॉन्सिल तर्फे प्रत्येक सहभागी होणार्‍या व्यक्तिच्या नावाने देण्यात येईल. सहभागी त्यांचे स्वत:चे घर वा घराच्या परीसरात (घरामागील अंगण, बाल्कनी, गच्ची आणि उद्याने, कोणत्याही सुरक्षित वातावरणात ) सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करुन फिरू शकतात. सहभागींनी कोणतेही सॅमसंग हेल्थ किंवा स्टेअप स्पिडोमीटर अ‍ॅप डाऊनलोड करून नाव नोंदवणे आवश्यक आहे. ऽहिलेर्रीीींवशपींर्लेीपलळश्र व ऽळपमीर्शीींळलशमेषमीीींरूी चा उल्लेख करुन स्क्रिनशॉट द्वारे आपली मार्गक्रमणा अपलोड करणेही आवश्यक आहे. कृपया या उपक्रमात मोठ्या संख्येने मनापासून सहभागी होऊन आमच्या या सामाजिक कार्याला भावनिक  आधार द्यावा आणि सेवाभाव वृध्दिंगत करण्यासाठी बळ द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.Comments