पनवेलकर सरसावले प्लास्टिक मुक्तीसाठी..

पनवेल :- प्लास्टिक डम्पिंग ग्राउंड वर जाऊ नये व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लागावी यासाठी आज ५० प्लास्टीक रीसायकलिंग वॉरीयरनी ८३ किलो प्लास्टीक कचरा, ठाणे येथील समर्थ भारत व्यासपीठ यांच्या प्लास्टिक पुनर्प्रक्रिया केंद्रात पाठविला.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अशाप्रकारे प्लास्टिक संकलन करण्यात येणार आहे. या मोहिमेत  सहभागी होण्यासाठी नागरिकांनी प्राजक्ता शहा यांच्याशी  +91 91671 12553 या  क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments