खांदा कॉलनी मूलगंधकुटी बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी...
खांदा कॉलनी / वार्ताहर : - खांदा कॉलनीतील मुलगंधकुटी बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन मुलगंधकुटे सामाजिक ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने करण्यात आले होते सर्वच कार्यक्रम महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन यशस्वी केला. 

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माता रमाई यांच्या विषयी बोलणाऱ्या वक्त्या या सर्व महिला होत्या, अगदी चौथीपासून ते सातवीपर्यंत विद्यार्थी, या सर्वांनी माता रमाई यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवले मावशी होत्या, सूत्रसंचालन आशा निंबाळे यांनी केले. याप्रसंगी सुरेखा वाघमारे ,पंचशीला भद्रे, मंगल जाधव, वत्सला सोनवणे, सुशीला इंगळे व इतर पंधरा महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रसेन कांबळे, राजेंद्र बावस्कर, पुंजाजी तायडे , दिनेश जाधव , डी जे जाधव इत्यादींनी मेहनत घेतली.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image