संस्कारभारती पनवेल समितीतर्फे ’जागतिक महिला दिना’निमित्त अभिवाचन स्पर्धेचे आयोजन..


पनवेल, दि.१७(वार्ताहर) :- संस्कारभारती पनवेल समिती  ’जागतिक महिला दिना’निमित्त  अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करत आहे.
आधुनिक स्त्री परंपरा, पुरुषप्रधान संस्कृती यांच्या पगड्यातून बाहेर आली आहे असे चित्र आता प्रगत समाजात दिसत आहे. या प्रवासात स्त्री आणि पुरुष  दोघांनाही भावनिक, सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. याचे सुक्ष्म पदर उलगडून दाखविणार्‍या स्त्री लेखकांच्या कथा, लेख यांचे  अभिवाचन करणे अभिप्रेत आहे. स्पर्धेचे नियम अभिवाचन मराठीत असावे, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा विषयावर नसावे, असंस्कृत व आक्षेपार्ह शब्दांचा वापर टाळावा, वयाचे बंधन नाही, स्पर्धेत स्त्री वा पुरुष कोणीही भाग घेऊ शकतात, वेळ पाच मिनिटे, आपल्या अभिवाचनाचा व्हिडिओ करून १मार्च २०२१ पर्यंत ( 9820138605 डॉ. समिधा गांधी किंवा 9320226072 श्री.मिलींद गांगल ) या नंबरावर पाठवावा, लेखकाच्या नावाचा उल्लेख असावा. जर लेखन स्वरचित असेल तर तसा उल्लेख करावा, अभिवाचनाबरोबर स्वतःचे नाव व पत्ता पाठवावा.

प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी  सात स्पर्धकांची निवड केली जाईल. अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांनी  ऑनलाईन माध्यमातून आपले सादरीकरण परिक्षकांच्या समोर झूम मिटींग मध्ये करावयाचे आहे. त्यातील तीन स्पर्धक विजयी म्हणून घोषित करण्यात येतील. 
यासाठी प्रथम क्रमांक रु १००० किमतीची पुस्तके, 
द्वितीय क्रमांक रु ७०० किमतीची पुस्तके, 
तृतीय क्रमांक रू ५०० किमतीची पुस्तके, 
अंतिम फेरीत निवडलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल व परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
Comments