पनवेल परिसरातील नागरी प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंना साकडे...

पनवेल, दि.२२ (वार्ताहर) :-  पनवेल परिसरातील विविध नागरी समस्या सोडविण्याासाठी नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट घेवून साकडे घातले आहे.

खारघर येथील एका कार्यक्रमादरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेवून पनवेल महानगरपालिका हद्दीत येणार्‍या विविध नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात त्यांना माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणी, गटार, विविध रेंगाळलेली विकास कामे, वाढणारा टॅक्स, बेकायदेशीर बांधकामे, कोव्हिड संदर्भात उभारण्यात येणारी रुग्णालये, केंद्रे यासह इतर नागरी प्रश्‍नांची माहिती एकनाथ शिंदे यांना शेवाळे यांनी दिली. याबाबत शासनाने विशेष निधी देवून पनवेलचा विकास करावा. तसेच याकामी पालकमंत्र्यांना सुद्धा आवश्यक त्या सूचना कराव्यात, अशी मागणी सुद्धा शेवाळे यांनी केली आहे. 

फोटो :-  एकनाथ शिंदे यांची रामदास शेवाळेंनी घेतलेली भेट
Comments