पत्रकार अरविंद पोतदार यांचा वाढदिवस कुष्ठरोगी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा....
पनवेल / ( नितिन देशमुख ) : पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या  कार्यकारिणीचे  सदस्य अरविंद पोतदार यांचा वाढदिवस शनिवार २० फेब्रुवारी रोजी पनवेल रेल्वे स्टेशन जवळील माल धक्का येथील गणेश कुष्ठरोग वसाहतीतील बांधवांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. 
    
पनवेल तालुका पत्रकार महासंघाची स्थापना झाल्यावर सदस्यांचे  वाढदिवस केक कापून साजरे न करता त्या ऐवजी गरजूंना मदत करून साजरे करू या असे ज्येष्ठ सल्लागार सुनील पोतदार आणि प्रमोद  वालेकर यांनी सांगितले होते. शनिवार २० फेब्रुवारी रोजी  महासंघाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद पोतदार यांचा वाढदिवस केक न कापता माल धक्का येथील  गणेश कुष्ठरोग वसाहतीत जाऊन तेथील बांधवांना खाऊचे  वाटप करून साजरा करण्यात आला. 
    
पत्रकार अरविंद पोतदार यांना कुष्ठरोग वसाहतीतील जेष्ठांनी दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद दिला.  गणेश कुष्ठरोग सेवा संघाचे सचिव अशोक आंबेकर यांनी सर्वांचे आभार मानले  यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार सुनील पोतदार,  प्रमोद वालेकर , अध्यक्ष रत्नाकर पाटील , प्रदीप वालेकर , सुधीर पाटील ,वाघपंजे , संजय कदम , गणेश कुष्ठरोग सेवा संघाचे प्रकाश पाटकर , विलास कदम , शैला आंबेकर, स्वाती केंडे आणि  अनीता जाधव उपस्थित होत्या
Comments