मास्क न लावल्याने दारू देण्यास नकार दिल्याने आरोपीने चाकू काढून दिली जीवे मारण्याची धमकी..


पनवेल दि.२८ (वार्ताहर): मास्क न लावता दुकानात दारू खरेदी करण्यास आलेल्या इसमास तूला दारू मिळणार नाही, प्रथम मास्क लाव असे सांगितल्याने त्याचा राग मनात ठेवून आरोपीने त्याच्याकडील सुरी काढून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          
शहरातील उज्वल वाईन शॉप या ठिकाणी आरोपी राकेश गोपाळ चखलिया (वय-४९ , रा.-पनवेल) हा दारू खरेदी कऱण्यासाठी गेला असता तेथील कर्मचारी फिरोज खान, विनोद चांदवानी व जुगल किशोर, शिवकुमार यांनी सदर इसमाने मास्क न लावल्याने दारू देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्याने त्याच्याकडील सुरी काढून त्यांच्यासमोर धरून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments