मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडून प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निवारण...
पनवेल / वार्ताहर :- ठाणा नाका रोड येथे असलेल्या पोलीस गुन्हे शाखा युनिट २ च्या परिसरातील  बरीच छोटी मोठी झाडे झुडपे वाढली होती, झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा सतत पडत असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्राला डास आणि अस्वच्छता याचा त्रास होऊ लागला होता.त्याबद्दलची अडचण काही नागरिकांनी प्रभागाचे कार्यक्षम नगरसेवक तथा मा. उपमहापौर श्री विक्रांत पाटील यांच्याकडे सांगितली होती. श्री विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून त्वरित कार्यवाही करत तातडीने साफ सफाई करून घेण्यात आली . 

"माझा प्रभाग,माझी जवाबदारी" या अनुषंगाने काम करणारे व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी विक्रांत पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या कोणत्याही समस्या अथवा सूचना यासाठी केंव्हाही हक्काने ९१६७०४२६६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातील.
Comments