तळोजा / (वचन गायकवाड) गणेश कांबळे या पीडित कामगाराने १६ फेब्रुवारी रोजी असाही इंडिया ग्लास लिमिटेड कंपनी आणि कामगार उपायुक्त कार्यालयाच्य प्रशासनाविरोधात पुकारलेल्या या आमरण उपोषणाची दखल वरिष्ठ स्तरावर थेट अप्पर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे यांनी घेतल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
तळोजा एमआयडीसी मध्ये असणाऱ्या असाही इंडिया ग्लास लि. कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पर्वसूचना न देता केवळ जातीय द्वेषभावनेतून कामावरून काढून टाकल्यामुळे या कंपनीची तक्रार कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती परंतू कामगार उपायुक्त कार्यालयाचे प्रशासनानेदेखील कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकार करीत असल्याच्या निषेधार्थ गणेश कांबळे या पीडित कामगाराने खांदा कॉलनी पनवेल येथील कामगार उपयुक्त कार्यालयासमोर १६ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण पुकारले परंतू या उपोषणाची दखल वरिष्ठ स्तरावर अप्पर कामगार आयुक्तांनी घेतल्याने सदरील उपोषण स्थगित करण्यात यावे असे पत्र रायगड विभागातील कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांनी उपोषणकर्ते गणेश कांबळे आणि भीमशक्ती संघटनेचे पनवेल तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड यांना देण्यात आले.
यावेळी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण स्थगित करण्याचे अपर उपआयुक्त शिरीन लोखंडे यांच्या आदेशाचे पत्र देण्यात आले असून त्यांनी या प्रकरणाची सुनावणी मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय येथील कामगार भवन, बांद्रा याठिकाणी २२ फेब्रुवरी रोजी दुपारी ३ वा. ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता या सुनावणी कडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.