वैकुंठवासी गोविंद महाराज स्मृती चषक कापडे खुर्द संघाने जिंकला..


नवी मुंबई / प्रतिनिधी :- १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी रबाळे - तळवली येथील गावदेवी मैदान वर वैकुंठवासी ह भ प गोविंद महाराज स्मृतीचषक कापडेखुर्द संघाने जिंकला. अंतिम फेरीत त्यांनी  चुरशीच्या सामन्यात शिवशम्बो आडावळे संघावर चित्तथरारक विजय मिळवला.
 
पोलादपूर तालुक्यातील ३२ ग्रामीण संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.सदर सामान्यांच्या उद्घाटन आणि बक्षीस  समारंभासाठी दासपान फॉरेक्स चे चेअरमन मांगीलाल जैन, जेष्ठ किर्तनकार  ह भ प रामचंद्र महाराज  शिंदे, जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील, उद्योजक अनंत गोळे, सिने अभिनेता योगेश अवसरे , सिने अभिनेत्री शुभांगीनी पाटील , पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश दादा कोळसकर, मनसे नवी मुंबई उपाध्यक्ष विनोद पार्टे, ह भ प प्रताप महाराज कुमठेकर,उद्योजक सुभाष महाब्दी,बीड स्पोर्ट्स चे अध्यक्ष अजय जाधव, घाटकोपर भाजपा नेते अविनाश जाधव, उद्योजक संजय उतेकर, छायाचित्रकार शशिकांत पाटील, उद्योजक गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.. 
 
कापडे  खुर्द प्रथम क्रमांक, शिवशम्बो आडावले द्वितीय भैरवनाथ देवळे तृतीय आणि काळकाई पळचिल चतुर्थ या  विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते  चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रथम क्रमांक ५१०००/-  चषक कापडे खुर्द 
द्वितीय क्रमांक २५०००/- चषक आडावले 
तृतीय क्रमांक १५०००/- चषक भैरवनाथ देवळे 
चतुर्थ क्रमांक ७०००/- चषक काळकाई पलचिल
उत्कृष्ट फलंदाज तेजस करंजे आडावले संघ
उत्कृष्ट गोलंदाज आकाश शेडगे आडावले
उत्कृष्ट यस्टीरक्षक ओंकार घडगे करंजे
मालिकावीर योगेश शेलार कापडे.

या क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.स्पर्धा यशस्वी होण्याकरिता उद्धवजी कुमठेकर, अंकुश महाराज कुमठेकर, संतोष मेढेकर,पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचेअमित घाडगे, युवराज दाभेकर  शिवतेज क्रीडा मंडळ ,काळकाई क्रीडा मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments