दिशा एन्टरटेन्मेन्ट अ‍ॅण्ड न्युज चा दिशा सन्मान २०२१ सोहळा दिमाखात संपन्न...
आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती 

पनवेल(प्रतिनिधी) दिशा एन्टरटेन्मेन्ट अ‍ॅण्ड न्युजचा ‘दिशा सन्मान २०२१’  सोहळा पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दिमाखात पाड पडला.
 ह्या सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रमाची रेलचेल पहायला मिळाली, महिलांसाठी समूह नृत्य स्पर्धा, आरोग्यावर चर्चा, हळदी कुंकू समारंभ  व १५ विविध शासकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा अस भरगच्च कार्यक्रम नियोजनपुर्वक पार पडला.
  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, डॉ. गिरीश गुणे, डॉक्टर संजीवनी गुणे, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेविका हेमलता गोवारी, मीना कटेकर, एनयूजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर, नवी मुंबईच्या नगरसेविका कोमल वास्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.    
या सोहळ्यात सामुहिक नृत्य स्पर्धेत विरार, बदलापूर येथील संघांनीही सहभाग घेतला होता. आपल्या दिलखेचक नृत्यांनी त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. लावणी सम्राट आशिमिक कामठे यांनी आपली ठसकेबाज लावणी सादर करुन कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिली. त्यांचे नृत्य सुरु असताना प्रेक्षकांनीही मनमुरात त्यांच्या नृत्याचा आस्वाद घेतला तर काही प्रेक्षक धडक स्टेजवर जावून त्यांच्या नृत्यात सामील झाले..
गायिका सोनाली सोनावणे, प्रशांत नाक्ती, विजय सोनवणे, प्रवीण कोळी, विनोदवीर झू झू किंग रंजीत ठाकूर, अभिनेता गिरीश म्हात्रे नृत्य दिग्दर्शक प्रशांत पवार आदंींनी छोटे परफॉरमन्स सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 
 या सोहळ्यातील नृत्य स्पर्धेचे परीक्षण लावणी सम्राट आशिमिक कामठे, प्रशांत पवार ह्यांनी केले ह्या वेळी अनेक संघ उपस्थित होते ह्यामधून 3 विजयी संघ निवडण्यात आले. विजयी संघाना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.  
डॉ. संजीवनी गुणे ह्यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल त्यांच्यासोबत संवाद साधताना महिलांसाठी अगदी सोप्या शब्दात बहुमूल्य माहिती देवून आपण घरच्या घरीच राहूनही आरोग्याची कशी काळजी घेवू शकतो हे सांगितले. आताच्या जीवनशैलीमुळे मुलींमध्ये वाढत चाललेले आजार व याबाबत घ्यायची काळजी याचे विश्‍लेषण त्यांनी केले.
या कार्यक्रमात 15 विविध शासकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांचे हळदीकुंकू त्यांना भेटवस्तू देऊन करण्यात आले. 
हा सोहळा यशस्वी होण्यामागे शुभचिंतक, हितचिंतक व मित्रपरिवार ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ह्या बद्दल दिशा टीम व दिशा एंटरटेनमेंट अ‍ॅड न्यूज चे संपादक सुनील कटेकर ह्यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहिता साळुंखे व कोमल डांगे यांनी केले.
Comments