एसबीआय क्रेडीट कार्ड मधून बोलतोय असे सांगून डॉक्टराची केली फसवणूक ...
पनवेल दि २१(वार्ताहर): एसबीआय क्रेडीट कार्ड मधून बोलतोय असे सांगून डॉक्टरांची फसवणूक केल्याची घटना शहरातील साईनगर परीसरात घडली आहे. 
        
पनवेल शहरातील साईनगर परीसरात राहणारे डॉ. संजय गुडे यांना अनोळखी इसमाने मोबाईल फोन करुन मी एसबीआय क्रेडीट कार्ड येथून बोलत असल्याचे सांगून व्हेरीफीकेशनसाठी कॉल आहे व क्रेडीट कार्ड एक्टीव्ह करावयाचे आहे. असे खोटे सांगून त्यांचे एसबीआय बँकच्या क्रेडीट कार्डची महिती घेऊन त्याद्वारे त्यांच्या संमती शिवाय त्यांचे क्रेडीट कार्ड मधून ९० हजार ७०८ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
    
Comments