पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची पुनर्निवड ..

सरचिटणीसपदी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी हरेश साठे, खजिनदारपदी नितीन कोळी  

पनवेल(प्रतिनिधी) पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास  मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची सर्वानुमते पुनर्निवड झाली आहे. 
        
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज (बुधवार, दि. २४)  पार पडली. यावेळी सन २०२१-२२ सालाकरिता कार्यकारिणीची बिनविरोध जाहीर झाली. त्यानुसार अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सरचिटणीसपदी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी हरेश साठे, खजिनदारपदी नितिन कोळी, कार्यकारिणी सदस्य म्हणून अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, प्रशांत शेडगे, अनिल भोळे, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, अनिल कुरघोडे हे जबाबदारी पार पडणार आहेत.  
          
यावेळी अध्यक्ष माधव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हंटले कि, पनवेल  तालुका पत्रकार विकास मंच गेल्या सोळा  वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून फक्त  पत्रकारिता नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे. दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच शाळांना डिटीजल करण्याच्या दृष्टीने प्रोजेक्टर संच देण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे.  कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे,  कर्तृत्वान महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, ब्लॅंकेटचे वाटप, अशी व इतर उपक्रमे वर्षभरात होत असतात. मागील वर्षात कोरोना काळातही पनवेल तालुका पत्रकार विकास मंच थांबले नाही, दुर्गम भागात जाऊन नागरिकांना अन्नधान्य तसेच सॅनिटायझरचे वाटप केले, असे नमूद करून  यापुढेही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमे मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Comments