उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करा; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी...


पनवेल /११ फेब्रुवारी - मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण-करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करावी. उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावाअशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

 याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदार बारणे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. याबाबतचे निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की,  केंद्र सरकारने  १६ मे १९९२ रोजी अध्यादेश काढून रायगड जिल्ह्यातील बोरी-पाखाडीकेगावम्हातवली या तीन गावातील महसुली हद्दीतील आणि उरण शहरातील सुमारे २७१ हेक्टर क्षेत्रातील शेतीबिनशेती जमीन उरण-करंजा येथील नौदल शस्त्रासागर डेपोसाठी सेफ्टी झोन आरक्षण जाहीर केले आहे. या सेफ्टी झोन परिसरात सुमारे ४० हजाराच्या आसपास रहिवासी वास्तव्यास आहेत.

 राज्य सरकारने १४ऑगस्ट २०१९, १५ जानेवारी २०२१ रोजी सेफ्टी झोन रद्द करण्यासाठी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मंजुरीसाठी हा विषय खात्याकडे प्रलंबित आहे. त्यावर कारवाई करत उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावाअशी विनंती  खासदार बारणे यांनी केली आहे.

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image