पुणे-लोणावळा लोकल सर्व सामान्यांसाठी तात्काळ सुरु करा; खा. श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी



पनवेल : ९ फेब्रुवारी : - पुणे - लोणावळा दरम्यान असलेली लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरु करावीअशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार बारणे यांनी निवेदन दिले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात बारणे यांनी म्हटले आहे कीकोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वेसेवा बंद केली होती. राजधानीएक्सप्रेस रेल्वेमाल वाहतूक करणाऱ्या रेल्वे बंद केल्या होत्या. सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत. मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा ते पुणे लोकल रेल्वे सेवा केली आहे. पणफेऱ्या कमी आहेत. दिवसभरात केवळ चारच फेऱ्या होत आहेत. मावळ भागातून अनेक सरकारी कर्मचारी पुणेमुंबईत नोकरीसाठी जातात. लोकच्या फेऱ्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे लोणावळा पुणे दरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वे सेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात.  जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचतील. जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील.

या भागातील अनेक नागरिक पुणेमुंबईत खासगी नोकरीसाठी जातात. पुणेपिंपरी-चिंचवडमध्ये जाण्यासाठी पीएमपीएमएल बसमध्ये मोठी गर्दी असते. सुरक्षित अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता देखील रेल्वेतून प्रवासाची मुभा द्यावीअशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image