ऑनलाईन व्यवहारात तरुणाची ८८,४२१ रुपयांची फसवणूक...

पनवेल, दि.१६ (वार्ताहर) :-  ऑनलाईन मागविलेला टी शर्ट कंपनीला परत करण्यासाठी गुगलवरुन वेबसाईट शोधून त्यानंबरद्वारे संपर्क साधला असता सदर इसमाने एका तरुणाची ऑनलाईन फसवणूक करून त्याच्या खात्यातील ८८,४२१/- रुपये काढून घेतल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.

ओमकार सावंत रा.कामोठे याने एका वेबसाईटवरुन टी-शर्ट मागविले होते. ते त्यांना परत करण्यासाठी त्याने गुगलवरुन त्या वेबसाईटचा नंबर शोधला व संपर्क साधला असता हिंदी भाषेत बोलणार्‍या अनोळखी इसमाने त्याच्याशी बोलून त्याचा विश्‍वास संपादन करून त्याच्या बँक खात्यातील इतर माहिती घेवून त्याच्या खात्यातील दोन ऑनलाईन व्यवहार करून ८८,४२१/- रुपये काढून घेवून त्याची फसवणूक केली आहे, अशी तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments