आरती पुस्तिकेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
केदार भगत मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम...
पनवेल / प्रतिनिधी : -
परंपरा, श्रद्धा आणि भक्तीची सुंदर परंपरा जपत भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार सुरेश भगत यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आरती पुस्तकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
केदार भगत हे अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणजे आरती संग्रह पुस्तिका, दरवर्षी गणेश भक्तांसाठी आरती संग्रह गणपती बाप्पा समोर आरती करताना उपयोगी पडतो. केदार भगत मित्र परिवारातर्फे याचे घरोघरी वाटप केले जाते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल घरोघरी त्यांचे कौतुक होते असते.
या आरती प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, हर्षद गडगे, सचिन जाचक, योगेश साळवी, संतोष वर्तले, भावेश शिंदे,यज्ञेश पाटील व मानव पालकर आदी उपस्थित होते.