धरणे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेवून नागरिकांनी आवश्यक ती खरबदारी घ्यावी - वपोनि गजानन घाडगे..
पनवेल तालुका पोलिसांच्या हद्दीतील धरणे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेवून नागरिकांनी आवश्यक ती खरबदारी घ्यावी - वपोनि गजानन घाडगे

पनवेल, दि. 7 (संजय कदम) ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरपर्यटकांच्या सुरक्षेसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्याआहेत. परिसरातील धरणे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनीआवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन वपोनि गजानन घाडगे यांनी केले आहे.  
या संदर्भात ठिकठिकाणी जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले आहेत. नदीपात्रांमध्ये अनेक ठिकाणी खोल डोह असून अचानकपाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे. विशेषतः लहान मुले, महिला तसेच पोहता न येणाऱ्या व्यक्तींनी पाण्यात उतरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गाडेश्वर धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा होत असल्याने नदीपात्रातकोणताही कचरा किंवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पर्यटनस्थळी मद्य, अमली पदार्थ किंवा इतर मादक द्रव्ये आणणे व सेवन करणे मनाई असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. परिसरातील रस्ते अरुंद व जंगलमय असल्याने वाहने रस्त्याच्या कडेला अथवा दुहेरी रांगेत उभी करू नयेत.आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल व रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा राहावा यासाठी वाहतूकनियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
तसेच पर्यटकांनी वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षेच्या दृष्टीने गाडेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोरबे धरण, कुंडी नदीपात्र, धरणोळी नदीपात्र, चिंध्रण व शांतिवन नदीपात्र तसेच माची प्रबळ परिसरात 26 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वयेप्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनी या आदेशांचेपालन करावे. कोणतीही संशयास्पद किंवा नियमभंगाची घटना आढळल्यास पनवेल तालुका पोलीसठाणे अथवा डायल 112 वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी केले आहे.


फोटो ः जनजागृती बॅनर
Comments