रोटरी क्लबतर्फे के. व्ही. कन्या हायस्कूलला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट...
रोटरी क्लबतर्फे के. व्ही. कन्या हायस्कूलला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट

पनवेल / प्रतिनिधी : -
 पनवेल येथील के. व्ही. कन्या हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन प्रदान करून सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष निलेश पोटे, हितेश राजपूत, व्ही. सी. म्हात्रे, चारूदत्त भगत, ऋग्वेद कांडपीळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्ही. सी. म्हात्रे, अध्यक्ष निलेश पोटे तसेच रोटरी क्लबचे आभार व्यक्त करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. उपस्थितांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image