समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोमल मोहनिष भोईर यांना 'टॉप 30 इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2026' प्रदान
पनवेल / प्रतिनिधी :-
समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने आणि निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कोमल मोहनिष भोईर यांना 'Top 30 Inspiring Women Awards 2026 अंतर्गत "Top Achiever Award 2026 – Inspirational Social Activist of the Year" या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.
कोमल मोहनिष भोईर या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य जनजागृती, गरजूंना मदत, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवा या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे.
हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, नेतृत्वगुण, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कोमल मोहनिष भोईर म्हणाल्या, "हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा, कुटुंबाचा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. समाजासाठी केलेले कार्य हीच माझी खरी ओळख असून, यापुढेही अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे समाजसेवा करण्यासाठी हा सन्मान मला नवी प्रेरणा देईल."
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. हा पुरस्कार त्यांच्या समाजसेवेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, त्यांच्या कार्यातून अनेक युवक-युवतींना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.