शिवसेनेच्या युवासेना पनवेल शहर अध्यक्षपदी कपिल भरत कुरघोडे यांची नियुक्ती
पनवेल / प्रतिनिधी : -
शिवसेना पनवेल महानगर मधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर येथील युवासेनेच्या शहर अध्यक्ष, सचिव, समन्वयक, उपाध्यक्ष तसेच महानगर उपाध्यक्ष या पदांच्या नेमणुका युवासेना मध्यवर्ती कार्यालय येथून करण्यात आल्या आहेत.
पनवेल मधील शिवसैनिक कपिल भरत कुरघोडे यांची पनवेल शहर अध्यक्षपदी तर विनीत पाटील यांची शहर सचिव पदी नेमणूक करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
मूळचे शिवसैनिक व पत्रकार असलेले कै.भरत कुरघोडे यांचे कपिल कुरघोडे हे सुपुत्र असून त्यांचा परिवार देखील शिवसेनेशी फार पूर्वीपासून जोडला गेला आहे. त्यांना मिळालेल्या पनवेल युवासेना अध्यक्षपदामुळे पनवेल मधील शिवसैनिक, युवा शिवसैनिक, कार्यकर्ते यांच्यामधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर पनवेल मधील शिवसेना, युवासेना, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.