कामोठे येथे सतत वीज खंडित प्रकरणी महावितरण अधिकाऱ्यांसोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली

कामोठे / प्रतिनिधी  :-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि महावितरण अधिकारी यांच्या उपस्थितीत कामोठे मधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठा संदर्भात बैठक पार पडली.
आज दिनांक ०१ जून २०२६ रोजी खांदा कॉलोनी येथील महावितरण कार्यालयात कामोठे शहरात सतत होत असलेल्या खंडित वीज पुरवठा प्रकरणी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच सतत कामोठेमध्ये खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वेंकटेश कासल, बकुल मानवटकर 
सहायक अभियंता, संतोष पालवे, संजय मुंडे, सुजीत पाटील, अभिजित साळवी उपस्थितीत होते. 
यावेळी श्री कासल यांनी कामोठ्याच्या लोड शेडिंगची समस्या एका आठवड्याच्या आत संपणार असल्याचे व पर्याय व्यवस्था उपलब्ध करत असल्याचे सांगण्यात आले व यापुढे नैसर्गिक कारणा व्यतिरिक्त कामोठे येथील लाईट बंद करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच जरी लाईट बंद करणार असल्यास किंवा अचानक लाईट बंद केल्यास त्वरित ग्राहकांना सूचना देण्यात येईल असे सुद्धा आश्वासन देण्यात आले. यावेळी पावसाळ्या अगोदर संपूर्ण कामोठे शहरांमधील ज्या ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढल्या मुले लाईटला धोकादायक असेल याची पेट्रोलिंग करून माहिती घेण्यास सांगण्यात आले. 
सदर बैठकीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद,उपमहानगरप्रमुख प्रभाकर गोवारी कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, कामोठे उपशहर प्रमुख गणेश खांडगे व राहुल यादव* हे उपस्थित होते.
Comments