शिवसैनिकांच्या हक्काचे घर म्हणजे नूतन कार्यालय ; उपनेेते बबनदादा पाटील
शिवसेना नूतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन येत्या ३१ मार्च रोजी होणार
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः शिवसैनिकांच्या हक्काचे घर म्हणजे नुतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन येत्या 31 मार्च रोजी पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेेब ठाकरे) पक्षाचे उपनेेते बबनदादा पाटील यांनी आज घेेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, जिल्हा सल्लागार शिरिष बुटाला, महानगरप्रमुख अॅड.समाधान काशिद, नगरसेविका, गटनेते लीना गरड, नगरसेवक नितीन गावंड, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे, तालुका संघटक रामदास पाटील, मा.उपनगराध्यक्ष अनिल टेमघरे, युवा सेना शहर चिटणीस साई सुरज पवार, मा.नगरसेवक अतुल पलन आणि मा.शहर संघटक राकेश टेमघरे, लिलाधर भोईर आदींसह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपनेते बबनदादा पाटील यांनी सांगितले की, समाजातील तळागळातील प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल शहरासारख्या ठिकाणी मध्यवर्ती भागात कार्यालय असणे गरजेचे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना या नुतन कार्यालयाची शिवसैनिक भेट आहे.
या कार्यालयाचे मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि.31 मे 2026 रोेजी दुपारी 4.00 वाजता ओझा हॉस्पिटल शेजारी असलेल्या तेजस अपार्टमेंट येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर जाहीर सभा तसेच पक्षप्रवेश व ज्येष्ठ शिवसैैनिकांचा सत्कार आदी कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख दिपक निकम यांनी दिली.
फोटो ः शिवसेना पत्रकार परिषद