परिमंडळ ३ पदाचा कार्यभार पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी स्वीकारला तर परिमंडळ १ ची विजय खरात यांच्याकडे जबाबदारी...
परिमंडळ ३ पदाचा कार्यभार पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी स्वीकारला तर परिमंडळ १ ची विजय खरात यांच्याकडे जबाबदारी
पनवेल , दि.21 (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 3 चा पदभार आज पोलीस उपायुक्त डॉ.रश्मी नांदेडकर यांनी स्वीकारला आहे. यावेळी विविध अधिकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर परिमंडळ 1 च्या महत्वाच्या ठिकाणी विजय खरात यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 
पोलीस आयुक्त भारंबे यांनी महिला अधिकार्‍यांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या देण्यावर भर दिल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. नांदेडकर या यापूर्वी विशेष शाखेत कार्यरत होत्या. त्यांना प्रथमच परिमंडळाचा कारभार सोपविण्यात आल्याने नवी मुंबई पोलीस दलात महिला नेतृत्वाला प्राधान्य दिले जात असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी परिमंडळ-3 अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात विमल बिडवे यांची प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच खांदेश्‍वर पोलीस ठाण्याची जबाबदारी स्मिता ढाकणे यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परिमंडळ-1 हे नवी मुंबईतील संवेदनशील आणि महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. या परिमंडळाची जबाबदारी विजय खऱात यांच्याकडे देण्यात आली आहे. नाशिक शहर, अमरावती सीआयडी विभागाचे पोलीस अधीक्षक, रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासह मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयातील दक्षता विभागात कामाचा खरात यांचा अनुभव आहे. तसेच परिमंडळ -3 चे उपायुक्त नांदेडकर यांच्या गाठीशी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे सर्वाधिक दंगल होणा-या तालुक्यात त्यांनी शांतता राखण्याचे काम यशस्वीरित्या करून दाखवले. त्यानंतर नाशीक एसीपी, भंडारा तेथून नागपूर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आणि राज्य गुप्तवार्ता विभाग असा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कामाचा अनुभव आहे. नवी मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेची जबाबदारी नांदेडकर यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. 
फोटो ः डॉ.रश्मी नांदेडकर व विजय खरात
Comments