अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईन आळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे - शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईन आळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे - शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर 

पनवेल दि. (१२) वार्ताहर : यापुढे येणारी परिस्थिती अत्यंत कठीण होत जाणार असून पनवेलमध्ये स्थानिकांबरोबर मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्ती व व्यापारी येथे येणार आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर यांनी लाईनआळीयेथील शिवाजी क्रीडा युवक मंडळाच्या महापूजा निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. 
यावेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शन भोईर, दीपक शेट्ये, सुधीर सावंत, जतीन भेंडे, शिवराज साखरे, राजेंद्र साखरे, विकास म्हात्रे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश गुडेकर यांनी सांगितले कि लाईनआळी येथील शिवशक्ती मित्र मंडळ,  शिवाजी क्रीडा युवक मंडळ व एकता मित्र मंडळ हि मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. हा विभाग माझा आहे. ह्या विभागाने मला बाप बनवले आहे. त्याला मी कधीही विसरणार नाही ह्या विभागातील कदम परिवार, चव्हाण परिवार, नरसाळे परिवार ह्या सर्व परिवारांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. प्रत्येक संघर्षामध्ये त्यांनी माझे संरक्षण केल्याने मी त्यांचे जास्तीत जास्त देणे लागत आहे. व मी हे माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून सर्वानी एकत्र यावे असे आवाहन गुडेकर यांनी केले. 


फोटो : रमेश गुडेकर सत्कार
Comments