श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थान येथे ३३१ वा वर्धापनदिन संपन्न ...
श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थान येथे ३३१ वा वर्धापनदिन संपन्न 

पनवेल वैभव , दि.०४ ( संजय कदम ) : पनवेल मधील प्रसिद्ध आणि पुरातन अशा श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थान (कापड बाजार जोशी आळी) पनवेल चा ३३१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे आज संपन्न झाला.
                          
या निमित्ताने आज पहाटे पासूनच  पुण्याहवाचन आणि रुद्रघनपाठाचा मोठा धार्मिक विधी संपन्न झाला . त्याच प्रमाणे   भाविकांनी देवळात दर्शनाला येऊन पुढे महाप्रसादाचा लाभ घेतला .या देवस्थांनामार्फत वर्षभर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे ट्रस्टी प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी दिली . 


फोटो - वर्धापन दिन
Comments