पनवेल तालुका पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती मासिक बैठक संपन्न ..
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची मासिक बैठक संपन्न 

पनवेल वैभव / दि. ८ ( संजय कदम  ) : पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे हद्दीतील महिला दक्षता समिती सदस्य यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.  
                            
या बैठकीला वपोनि गजानन घाडगे  व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांनी विशेष मार्गदर्शक तसेच सूचना केल्या त्यामध्ये  महिला/ मुली यांची सुरक्षा यावर चर्चा/ मार्गदर्शन केले. सायबर क्राईम, नशा मुक्ती चर्चा / मार्गदर्शन व सदर बाबत माहिती मिळाल्यास डायल 112 सकाळ संपर्क करणे. शाळा /कॉलेज येथे विद्यार्थीनी यांचे सुरक्षेच्या दृष्टीने महिला वार्डन नेमणे बाबत. उपस्थित शिक्षिका- महिला दक्षता सदस्य यांना सूचना केली आहे. महिला सक्षमीकरण, महिलांचे अडीअडचणी , तक्रारी या करिता पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. महिला दक्षता समिती सदस्य यांच्या अडीअडचणी ऐकून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलेले आहे .सदर बैठकीत महिला दक्षता समिती सदस्य व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.
 

फोटो -  महिला दक्षता समिती मासिक बैठक
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image