पनवेल विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या विधानसभा संपर्क प्रमुख पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना कार्याध्यक्ष श्पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार तसेच कार्यकारणी सदस्य, विभागीय सचिव तथा रायगड लोकसभा संपर्क प्रमुख विकास गोगावले आणि कार्यकारणी सदस्य, विभागीय सचिव तथा मावळ लोकसभा संपर्क प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा संपर्क प्रमुख पदी ॲड. अभिनय चंद्रशेखर सोमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनीही अभिनय सोमण यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या युवासेना संघटन विस्तार मोहिमेअंतर्गत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात येत आहे.
ॲड. अभिनय सोमण यांनी यापूर्वी युवासेना पनवेल शहर सचिव म्हणून कार्य करताना पक्ष संघटना, निवडणूक नियोजन आणि विविध आंदोलनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांचे ते पुत्र आहेत तर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पनवेल महानगरप्रमुख तथा नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांचे ते बंधू आहेत. त्यामुळे शिवसेनेचे बाळकडू कुटुंबातूनच त्यांना मिळाले आहे. विधानसभेतील S.I.R. प्रक्रिया, पक्ष बांधणी, सदस्य नोंदणी अभियान आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याची मोहीम सदर विधानसभा संपर्क प्रमुखांकडे सोपवण्यात आल्याची माहिती युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते यांनी दिली.